बाजार समितीच्या जमा खर्चाचे लेखे ठेवणे, विवरणपत्रके दाखल करणे. त्यानुसार वार्षिक उत्पन्न खर्च पत्रक व ताळेबंद तयार करणे. यासंबधीचे अर्थसंकल्प तयार करणे व विविध कर विषयक आणि लेख्यांचे लेखापरीक्षण करुन घेणे.
शेतीमाल खरेदी विक्रीचे अनुषंगाने प्राप्त झालेल्या विवादांचे तक्रारीचे अनुषंगाने, शेतक-यांचे हिशोबपट्टीच्या रकमा वसुल करुन देणे विषयी अधिनियम, नियम व उपविधीनुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.
संचालक मंडळ सभा व वार्षिक सभेविषयीचे विषय पत्रिका तयार करणे, सभावृत्तांत लिहणे व ठरावांची अंमलबजावणी करणेकरीता सर्व विभागांना कळविणे.
कर्मचा-यांचे सेवाविषयक सर्व प्रकरणाच्या नोंदी ठेवणे, कर्मचारी भरती, पदोन्नती, बिंदु नामावली, सेवानिवृत्ती इ. विषयकची सर्व कामे पाहणे.
मुख्य बाजार आवाराची सुरक्षितता व सुव्यवस्था राखणे, बाजार आवारामध्ये वाहतुकव्यवस्था सुरळीत राहिल याची दक्षता घेणे, अतिक्रमण व पार्किंग व्यवस्था इ. संबधिचे सर्व कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवणे.
मुख्य बाजार आवाराची सुरक्षितता व सुव्यवस्था राखणे, बाजार आवारामध्ये वाहतुकव्यवस्था सुरळीत राहिल याची दक्षता घेणे, अतिक्रमण व पार्किंग व्यवस्था इ. संबधिचे सर्व कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवणे.
मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार विभागाकडुन दैनिक आवक, विक्री, बाजार भाव, उलाढाल बाबतची माहीती घेऊन ती एकत्रित करुन माहिती अद्यायावत ठेवणे. साप्ताहिक व मासिक रिपोर्ट, वार्षिक अहवाल तयार करणे.
सर्व विभागाकडुन आलेले अनुज्ञप्ति फॉर्मची संपूर्ण तपासणी करून त्याची मंजूरी प्रक्रीया राबविणे व अनुज्ञप्तीधारकांस देणे व नुतनीकरणाच्या नोंदी ठेवणे.
बाजार समितीच्या गाळे, भुखंड, वखारी, दुकाने इ. मालमत्तेचे रेकॉर्ड अदयावत ठेवणे, गाळे/ भुखंड/ वखारी इत्यादीच्या वर्गीकरण, वारसनोंद, भागीदारी, भागीतोड, वाटणीपत्र, हक्कसोड तसेच याविषयीचे कोर्टाचे आदेशानुसार कार्यवाही करणे इ. बाबतच्या प्रक्रिया पूर्ण करुन नोंदी घेणे. कर्ज/वीज/करसंकलन याबाबतचे मागणीनुसार ना हरकत दाखले देणे. कर्ज बोजा नोंद करणे, भाडेपट्टा व सरेंडर डिडबाबतचे कामकाज करणे, बाजार समितीच्या ताब्यात व नावावर असलेल्या मिळकतींचा मिळकत कर तसेच बिगर शेतसारा भरणे.
बाजार समितीस प्राप्त होणा-या शासकीय व बाजार समितीशी संबधित सर्व पत्रांची आवक रजिस्टरला नोंद घेणे. सदरची पत्रे संबंधीत विभागांना पोहच करणे तसेच बाजार समितीकडून शासकीय व इतर संबधित घटकांच्या कार्यालयांना होणारा पत्रव्यवहाराची नोंदी जावक रजिस्टरला घेणे तसे संबंधीतांना पोहचविणे.
