शेतकरी ते थेट ग्राहक शेतीमाल विक्री व्यवस्थेअंतर्गतच ग्राहकाला रास्त दराने भाजी घरपोच मिळावी या अनुषंगाने "डायल फॉर भाजी" हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये ग्राहकांनी त्यांना आवश्यक असलेल्या भाज्यांबाबतची मागणी ही मोबाईल नं ९५५२५२८१८० व ९५५२५२८१९० यावरुन तसेच या ईमेल वर नोंदविली जाते. व मागणी प्रमाणे ताजी, स्वच्छ व रास्त दरातील भाजी प्रत्येक सोमवार व गुरुवार सकाळी ७ ते १० या वेळेत संबधित ग्राहकास घरपोच केली जाते. सद्यस्थितीत ही सेवा गंगाधाम सह.गृहनिर्माण संस्था (बिबवेवाडी ,कोंढवा रोड) व रम्यनगरी सह.गृहनिर्माण संस्था (बिबवेवाडी) या दोन गृहनिर्माण सह.संस्था मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली असून यांची व्याप्ति लवकरच वाढविण्यात येत आहे.