उपक्रम

शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी व्यवस्था

शेतकर्‍यांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला शेतीमाल थेट पद्धतीने ग्राहकास रास्त दरात उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर शेतकर्‍यांस देखील त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी ही बाब विचारात घेऊन बाजार समितीने शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेतीमाल विक्री व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र शेड उभी केलेली आहे. सदर शेड मधील जागा शेतकर्‍यांस त्याचा सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केलेली आहे.