शासन निर्णयानुसार वाढत्या महागाईला आळा घालण्याकारिता शेतकर्यांच्या शेतीमालास योग्य तो बाजारभाव मिळावा व शेतकर्यांचा १०० टक्के फ़ायदा होउन ग्राहकाला रास्त बाजारभावात शेतीमाल उपलब्ध व्हावा याकरिता मध्यस्थाशिवाय शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील १७० शेतकर्यांच्या गटास त्यांचा उत्पादित शेतीमाल थेट पद्धतीने फळे भाजीपाला विभाग, गुलटेकडी, मार्केटयार्ड येथे दिनांक १३/९/२००९ पासून विक्री व्यवस्था सुरू केलेली आहे. त्यास सर्वसामान्य ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी १ मे.टन एवढा शेतीमाल या विक्री केंद्रातून विक्री होतो.