स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार आवार

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार आवार हा 29 जुलै2010 रोजी सुरु झालेला असुन सदर उपबाजार हा 5 एकर 18 गुठे क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे. सदरचा बाजार हा महाराष्ट्रातील एकमेव आडत्यारहीत उपबाजार आहे. या उपबाजार आवारामध्ये हवेली, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर या तालुक्यातील शेतक-याकडुन शेतमाल विक्रीसाठी आणण्यात येतो.

    विभागातील उपलब्ध सुविधा –
  1. पिण्याचे स्वच्छ पाणी- पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट आहे.
  2. स्वच्छतागृहे – स्त्री व पुरुष यांचेकरीता प्रत्येक सेलहॅालमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था करणेत आलेली आहे.
  3. पार्किंग – शेतकरी/व्यापारी/उतर बाजार घटकांकरीता पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.
  4. बसण्यासाठी निवारा – बाजार आारातील सर्व घटकांना खरेदी-विक्री व्यवहार सुरु होण्यापुर्वी बसण्यासाठई प्रशस्त पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
  5. सेलहॅाल-शेतमाल खरेदी विक्रीसाठी तीन मोठे अद्यावत सेलहॅाल आहेत.
  6. इलेक्ट्रॅानिक वजनकाटे- शेतमालाचे अचुक वजन करणेसाठी इलेक्ट्रॅानिक वजनकाटे सेलहॅालमध्ये बसविणेत आलेले आहेत.