पिंपरी उपबाजार

बाजार समितीचे नांव/उपबाजार कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे – पिंपरी उपबाजार
कार्यालयाता पत्ता व्यंकटेश मार्केट इमारत, गाळा क्र. 39 व 40, उड्डाणपुला शेजारी पिंपरी, 411017
पिंपरी उपबाजार आवार वेळ
लिलाव वेळाकपत्रक
भाजीपाला विभाग – पहाटे 5 ते सकाळी 10
फुले विभाग – पहाटे 6 ते सकाळी 10
भूसार विभाग – सकाळी 8 ते दुपारी 3

उपबाजार वेळापत्रक

अनु.क्र . उपबाज़ाराचे नाव कामकाजास सुरवात कामाची वेळ साप्ताहीक सुट्टी
पिंपरी-चिंचवड १९७७ स. ५ ते सायं. ५ नाही
खड़की १९७७ स. ६ ते दुपारी. २ नाही
मोशी -- -- --
मांजरी -- -- --

स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार आवार

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार आवार हा 29 जुलै2010 रोजी सुरु झालेला असुन सदर उपबाजार हा 5 एकर 18 गुठे क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे. सदरचा बाजार हा महाराष्ट्रातील एकमेव आडत्यारहीत उपबाजार आहे. या उपबाजार आवारामध्ये हवेली, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर या तालुक्यातील शेतक-याकडुन शेतमाल विक्रीसाठी आणण्यात येतो.

    विभागातील उपलब्ध सुविधा –
  1. पिण्याचे स्वच्छ पाणी- पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट आहे.
  2. स्वच्छतागृहे – स्त्री व पुरुष यांचेकरीता प्रत्येक सेलहॅालमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था करणेत आलेली आहे.
  3. पार्किंग – शेतकरी/व्यापारी/उतर बाजार घटकांकरीता पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.
  4. बसण्यासाठी निवारा – बाजार आारातील सर्व घटकांना खरेदी-विक्री व्यवहार सुरु होण्यापुर्वी बसण्यासाठई प्रशस्त पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
  5. सेलहॅाल-शेतमाल खरेदी विक्रीसाठी तीन मोठे अद्यावत सेलहॅाल आहेत.
  6. इलेक्ट्रॅानिक वजनकाटे- शेतमालाचे अचुक वजन करणेसाठी इलेक्ट्रॅानिक वजनकाटे सेलहॅालमध्ये बसविणेत आलेले आहेत.

मोशी उपबाजार आवार

श्री.नागेश्वर महाराज उपबाजार आवार हा 8 हेक्टर 83 आर क्षेत्रावर असुन , सदर उपबाजारामध्ये खालीलविभाग आहेत

गाळे/भुखंड बाजाराची वेळ साप्ताहीक सुट्टी
फळे-भाजीपाला विभाग 159 पहाटे 5 ते दु.12.00 बुधवार
भुसार विभाग 42 सकाळी 10. ते दु.5.00 बुधवार
गुरांचा बाजार 2 एकर दिवसभर बुधवार

    विभागातील कार्यरत सुविधा
  1. बाजार आवारात शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सुविधा उपलब्ध आहे.
  2. नवीन १०० टनी वजनकाटा कार्यान्वित केलेला आहे.
  3. दोन वेअर हाउस गोडाऊन उभारणीचे काम पूर्ण झालेले आहे.
  4. बाजार आवारात सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित आहे.
  5. बाजार आवारात वाहन तळ (पार्किंग) सुविधा उपलब्ध आहे.